देशातील काही भागात समस्या – ‘जिओ’ झाले ट्रोल
मुंबई –
सोमवारी जगभरातील फेसबुकसह इंडस्टाग्राम, व्हॉटसऍपचे नेटवर्क प्रभावीत झाल्यामुळे यांचे लाखो ग्राहक प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले. सदर घटनेनंतर कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे कोटय़वधीचे नुकसान झाले व ग्राहकांनाही मनस्ताप झाल्याने झुकरबर्ग यांनी माफीनामा जाहिर केला आहे. ही घटना ताजी असतानाच भारतामधील दिग्गज दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ यांचेही नेटवर्क बुधवारी प्रभावीत झाले होते.
साधारणपणे बुधवारी सकाळी 9 वाजता ही समस्या निर्माण झाली असून यामध्ये संपूर्ण देशात नेटवर्क बाधित न होता ट्विटरवरील माहितीनुसार मध्य प्रदेश, छतीसगढ, मुंबई, दिल्ली, बेंगळूर आणि आणखीन काही शहरांमध्ये ही समस्या निर्माण झाल्याची माहिती आहे. जवळपास एक ते दीड तासापर्यंत ही समस्या ग्राहकांना सहन करावी लागली. जुलै महिन्यात रिलायन्स जिओच्या ऍक्टीव्ह ग्राहकांची संख्या 61 लाखांनी वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार
हॅशटॅगसोबत नेटवर्क समस्येच्या तक्रारीसह जवळपास साडे पाच हजार ट्वीट करण्यात आली आहेत.