प्रतिनिधी/ पणजी
फोंडा येथील सेंट्रल लायब्ररी जवळील पालिका मैदानावर आज दि. 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान फोंडा शॉपिंग फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वा. पासून रात्री 8 वा.पर्यंत हे फेस्टीव्हल सगळ्य़ांसाठी खुले राहणार आहे.
जवळपास 100 स्टॉल्स या फेस्टीव्हलमध्ये असणार असून यात सौंदर्यप्रसाधने, ड्रेस मेटेरियल, आकर्षक भांडी, गालिच्छा, शर्ट, टॉय, कुर्ती, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी गेमींग झोन असणार आहे. यात विविध वस्तुंवर आकर्षक सवलतही देण्यात येणार आहे.