मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी फोर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अनुराग मेहरोत्रा हे लवकरच पदाचा राजीनामा देणार आहेत. सप्टेंबरअखेर ते या पदावरून पायउतार होतील, असे सांगितले जात आहे. मेहरोत्रा यांनी कंपनीसाठी विपणन, विक्री या विभागांमध्ये विविध जबाबदाऱया उत्तमपणे निभावल्या आहेत. करिअरमधल्या इतर संधी आजमावण्यासाठी मेहरोत्रा हे फोर्ड इंडियामधून बाहेर पडणार आहेत. अमेरिकेतील कंपनीकडून आशिया विभागाकरिता तयार होणाऱया कार्सचे उत्पादन थांबविले जाणार आहे. मेहरोत्रा यांनी फोर्ड इंडियामध्ये एक दशक इतकी वर्षे विविध पदांवर काम करत आपला अनुभव प्राप्त केला आहे.