ऑनलाईन टीम / शाहूपुरी :
जगभरात नावाजलेल्या व भारतात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकलूज येथील फ्रटेली वाईनच्या ‘टील्ट’ या पेयाचे तरुणाईमध्ये आकर्षण निर्माण झाले असून, ही वाईन आता ‘टील्ट’ या नावाने चार प्रकारात कॅनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
विक्री व्यवस्थापक राजीव पुरोहित म्हणाले, फ्रटेली वाईनला लंडन येथे सुवर्णपदक प्राप्त झाले असून, सध्या ही वाईन अमेरिका, जपान, हाँगकाँग,डेन्मार्क येथे जाते. महाराष्ट्रात अकलूज, इंदापूर, उस्मानाबाद, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व मुंबई तर कर्नाटकात विजयपूर या परिसरात विक्री व्यवस्था उभारण्यात आल्याचे ते म्हणाले.
केदारी वाईन मेकर वृषाल केदारी म्हणाले, व्हाईट वाईन मध्ये व्हिटॅमीन सी असते तर रेड वाईन शरिरातील रक्तभिसरण क्रिया चांगली ठेवते. त्यामुळे हृदयविकारासारखे आजार टाळता येतात. यात केवळ 11 टक्के अल्कोहोल आहे. तरुण वर्गासाठी हीवाईन कॅनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. पारंपारिक वाईन ही ग्लासमध्ये ओतून पिली जात होती. ही वाईन काचेच्या बॉटलमध्ये होती. ती कॅनमध्ये आणावी असा अभ्यास मागील दोन वर्षापासून आम्ही करीत होतो. त्यानुसार एकाच वेळी चार प्रकारची वाईन आम्ही तयार केली आहे.