6 मशिदी अन् संशयास्पद संघटना होणार बंद
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सने इस्लामिक कट्टरवादी संघटनांच्या विरोधात कारवाईचा फास आवळला आहे. देशातील 6 मशिदी आणि संशयास्पद संघटनांना बंद करण्याची कारवाई केली जात आहे. इंटीरियर मिनिस्टर (एकप्रकारे गृहमंत्री) जेरार्ड डारमॅनिन यांनी बुधवारी याची माहिती दिली आहे.
89 धार्मिक स्थळांपैकी एक-तृतीयांशांवर कट्टरवाद्यांचा प्रभाव असल्याचा संशय आहे. गुप्तचर यंत्रणा सातत्याने या संघटनांवर नजर ठेवून असल्याचे डारमॅनिन यांनी सांगितले आहे.
एक वर्षात 10 संघटना बंद करण्याची आणि 4 संघटनांवर पुढील महिन्यात कारवाई केली जाणार असल्याचे फ्रान्सच्या अंतर्गत मंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच फ्रास सरकार इस्लामिक पब्लिशर्स (प्रकाशक) नवा आणि ब्लॅक आफ्रिकन डिफेन्स लीग (एलडीएनए) देखील बंद करण्याच्या तयारीत आहे.
एरीगे शहरात नवा हे प्रकाशन ज्यूंना पळवून लावण्यासाठी चिथावणी देणारे आहे. तसेच समलैंगिक लोकांना दगडांनी मारण्याच्या घटनां बळ पुरविणारे आहे. एलडीएनएने मागील वर्षी जून महिन्यात पॅरिसमध्ये अमेरिकेच्या दूतावासासमोर पोलीस हिंसेवरून निदर्शने केली होती असे डारमॅनिन यांनी सांगितले.
ऑक्टोबर 2020 मध्ये शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची हत्या करण्यात आली होती. पॅटी यांनी वर्गात एका नियतकालिकात प्रसिद्ध वादग्रस्त व्यंगचित्र वर्गात प्रदर्शित केले होते. पॅटी यांच्या विरोधात ऑनलाईन मोहीम चालवून त्यांची हत्या करण्यात होती. या घटनेनंतर सरकारने धार्मिक कट्टरवाद्यांच्या विरोधातील कारवाईला वेग दिला आहे.