ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून, मागील 24 तासात कोरोनाचे 833 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत एका दिवसात नोंदवण्यात आलेली ही सर्वाधिक मृत्यूची संख्या आहे.फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हर वेरन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
फ्रान्समध्ये आतापर्यंत 98 हजार 010 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत 8911 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17हजार 250 जणया आजारातून बचावले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी फ्रान्समध्ये 17 मार्चपासूनच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, जगभरात आतापर्यंत 13 लाख 60 247 जणांना कोरोनाची बाधा झाली तर 76 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.