नवी दिल्ली
इ कॉमर्स क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी फ्लिपकार्टने अलीकडेच साहित्याचा साठा करण्यासाठी कोठार भाडेतत्वावर घेतले असल्याचे समजते. 20 लाख चौ. फू. जागेचे हे कोठार दिल्ली-एनसीआर जवळ घेतल्याचे सांगितले जाते. ग्राहकांच्या वाढत्या वस्तुंच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी सदरची जागा कंपनीने घेतली आहे. 8 मेट्रो शहरांमध्ये जास्तीत जास्त जागा साहित्य साठवणुकीसाठी फ्लिपकार्टने भाडेतत्वावर घेतली आहे.