वृत्तसंस्था/ कोलकाता
2022 च्या रणजी क्रिकेट हंगामासाठी सराव करणाऱया बंगाल रणजी संघातील सात खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्या पूर्वतयारीला मोठा धक्का बसला आहे.
2022 च्या रणजी हंगामाच्या पूर्वतयारीला एक दिवस बाकी असताना बंगालच्या संघाला कोरोना समस्येने ग्रासले आहे. रणजी स्पर्धेसाठी बंगालचा संघ ब गटात असून या गटात विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा, त्रिपुरा यांचा समावेश आहे. बंगालचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 13 जानेवारीपासून त्रिपुरा बरोबर बेंगळूरमध्ये खेळविला जाणार आहे. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या बंगाल संघातील सात खेळाडूंना आता काही दिवसांसाठी विलगीकरणामध्ये रहावे लागणार आहे. सुदीप चटर्जी, ए मुझुमदार, काझी सैफ, गीत पुरी, पी. प्रामाणिक, सुरजीत यादव आणि सहाय्यक प्रशिक्षक एस. लाहिरी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.