वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू असलेल्या एटीपी चषक पुरूषांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत जॉर्जियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पोलंडने जॉर्जियाचा पराभव केला. दुसऱया एका लढतीत रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटने नॉर्वेच्या कास्पर रूडचा पराभव करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे.
या स्पर्धेतील स्पेन आणि नॉर्वे यांच्यातील अ गटातील लढतीत सोमवारी झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात रॉबर्टो ऍगटने नॉर्वेच्या रूडचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे. ड गटातील लढतीमध्ये कॅमिल मॅजेझेकने जॉर्जियाच्या बक्षीचा 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करून पोलंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनच्या हुरकेझने जॉर्जियाच्या मेट्रेविलीवर 6-7 (5-7), 6-3, 6-1 अशी मात करत आपल्या संघाची आघाडी 2-0 अशी एकतर्फी मिळवून दिली. या आघाडीमुळे पोलंडने जॉर्जियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.