वृत्तसंस्था/ बुसलेस
उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या विविध ऍथलिटस्वर बंदी घालण्यात आली आहे. आता या ऍथलिटस्वरील घातलेला बंदीचा कालावधी संपुष्टात येत असून कोरोना व्हायरसमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. दरम्यान बंदीचा कालावधी संपुष्टात येणाऱया ऍथलीटस्ना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी अनपेक्षित मिळाली आहे.
तुर्कीची महिला धावपटू गॅमेझी बुलूट हिला आता आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 2020 ची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय गेल्या महिन्यात स्पर्धां आयोजकांनी घेतला होता. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 23 जुलै 2021 साली होणार आहे. गॅमेझीने लंडन ऑलिम्पिकमध्ये 1500 मी.मध्ये रौप्यपदक मिळविले होते.
पण पासपोर्ट संदर्भात कागदपत्रामध्ये काही गोंधळ निर्माण झाल्याने तिला आपले पदक परत करावे लागले आणि 2016 साली तिच्या चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. तिच्या बंदीचा कालावधी 29 मे 2020 साली संपुष्टात येणार असल्याने तिला आता टोकियो ऑलिंपिक पात्रतेसाठी अनपेक्षितरित्या एक वर्षांचा कालावधी मिळाला आहे.