नवी दिल्ली
वाहन निर्मितीमधील कंपनी बजाज ऑटोच्या मार्च महिन्यातील विक्रीचे आकडे सादर झाले असून कंपनीची एकूण वाहन विक्री 3,69,448 वर राहिली आहे. हीच विक्री कोरोनाच्या संकट काळात मार्च 2020 मध्ये 2,42,575 वर राहिली होती. मागील महिन्यात बजाज ऑटोच्या एकूण दुचाकींची विक्री 3,30,133 इतकी झाली आहे.