अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफचा चित्रपट
अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉपचा आगामी चित्रपट बडे मियां छघ्sटे मियांचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या चित्रपटाचा रिमेक आहे. टीझरमध्ये दमदार ऍक्शन दृश्ये दिसून येत आहेत. चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी आणि जॅकी भगनानी करत आहेत. तर अली अब्बास जफर याचे दिग्दर्शन करत आहेत.
चित्रपटात अक्षय बडे मियांच्या भूमिकेत तर छोटे मियांच्या भूमिकेत टायगर दिसून येणार आहे. “ज्या वर्षी तू या जगात पदार्पण (जन्म घेतला) केलस त्याच वर्षी मी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. तरीही मुकाबला करणार छोटे मियां’ मग होऊन जाऊ दे फुल ऍक्शन’’ असे अक्षयने चित्रपटाचा टीझर शेअर करत ट्विटरवर म्हटले आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत. हा चित्रपट माझ्या मनाच्या अत्यंत जवळ आहे, कारण यात अमिताभ बच्चन आणि गोविंदा दिसून आले होते. डेव्हिड धवन यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. रिमेकमध्ये अक्षय आणि टायगरची निवड करून अत्यंत आनंदी असल्याचे वासू भगनानी यांनी म्हटले आहे.