ऑनलाइन टीम / गुजरात :
बडोदा येथील ऑक्सजिन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बडोद्यातील एआयएमएस इनस्टिटय़ूट प्रा. लि. येथे आज स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.