अनगोळच्या तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
बलात्कार प्रकरणात धारवाड येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात अनगोळ येथील एका तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
धारवाड येथील एक मुलगी यापूर्वी अनगोळ परिसरात राहत होती. रघुनाथपेठ, अनगोळ येथील एका तरुणाने प्रेमाचे नाटक करून फेब्रुवारी 2020 मध्ये तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सध्या त्या अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय धारवाडला राहते. त्यामुळे 19 ऑक्टोबर रोजी धारवाड येथील विद्यागिरी पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव येथे हा प्रकार घडल्यामुळे गुरुवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात हे प्रकरण वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत. धारवाड पोलिसांनी संबंधिताला अटकही केली असून कुसमळीजवळील एका हॉटेलमध्ये बलात्काराचा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले..