वार्ताहर / नंदगड
खानापूर-यल्लापूर राज्यमार्गावरील झुंजवाड गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोघांना पाठीमागून येऊन बसने ठोकरल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.शांताराम विठ्ठल पाटील( वय 43) असे जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर परशराम यल्लापा पाटील (वय 30) त्याच्या कमरेला जबर मार बसला आहे. त्याला अधिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दोघेही झुंजवाड गावचे रहिवाशी आहेत. मृत शांताराम विठ्ठल पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील असा परिवार आहे.