केवळ 24 हजार बसपास विद्यार्थ्यांच्या हातात
प्रतिनिधी / बेळगाव
यंदा बदलेल्या बसपास प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थंडाच असून आतापर्यंत केवळ 24 हजार 238 बसपास विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की बसपासला मोठय़ा मागणी वाढावयची. मात्र यंदा बसपास काढण्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
परिवहन मंडळाने विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सध्या जुन्या बसपासवर सुरु आहे. मात्र मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांना नवीन पास अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 28 फेब्रुवारीपर्यंत बसपास काढावा लागणार आहे. दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की, बसपास प्रक्रिया सुरु व्हायची. मात्र यंदा कोरोनामुळे बऱयाच कालावधीसाठी शाळा बंद राहिल्याने बसपास प्रक्रिया ही लांबणीवर पडली होती. गत महिन्यापासून बसपास प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांचा या ऑनलाईन बसपास प्रक्रियेला प्रतिसाद कमी असलेला पहायला मिळत आहे.
परिवहनकडून सवलतीच्या दरात देण्यात येणारा बसपासच्या आधारे लाखो विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे बसपासच्या माध्यमातूनही परिवहनला मोठा महसूल मिळतो. मात्र यंदा केवळ 24 हजार विद्यार्थ्यांनीच बसपास मिळविल्याने परिवहनला बसपासच्या माध्यमातून मिळणाऱया अधिक महसूलला मुकावे लागले आहे. यंदा कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद राहिल्याने बसपासच्या कामालाही स्थगिती मिळाली. आता शाळा, कॉलेज सुरु झाली तरी केवळ 24 हजार विद्यार्थ्यांनीच बसपास मिळविले आहेत.