सांबरा : बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी लक्ष्मी गल्लीतील करेव्वा मंदिरासमोरून प्रेरणामंत्राने दौडला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बसवाण गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, गांजिरप्पा गल्ली, छत्रपती शिवाजी गल्लीसह गावातील सर्व मार्गावरून दौड काढण्यात आली. गावामध्ये ठिकठिकाणी आरती ओवाळून दौडचे स्वागत करण्यात आले. शेवटी दौड बसस्टँडजवळील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर ध्येयमंत्र व आरती म्हणून दौडची सांगता करण्यात आली. दौडला दररोज वेगवेगळय़ा मंदिरांपासून सुरुवात करण्यात येते. तर सांगता बस स्टँडजवळील छत्रपती शिवाजी चौकामध्ये करण्यात येते. दौडमध्ये विविध स्फूर्तीगिते गाण्यात येत असून विविध देवदेवतांच्या घोषणा देण्यात येत आहेत. यामुळे वातावरण चैतन्यमय होत आहे. यावर्षी दुर्गामाता दौडमध्ये वायफळ खर्च न करता कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 मण सुवर्ण सिंहासनाला देणगी देण्याचे ठरविले आहे. तसेच यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दौड साधेपणाने काढण्यात येत असून दौडमध्ये सहभागी कार्यकर्ते मास्क परिधान करून व सामाजिक अंतर ठेवून भाग घेत आहेत.
Previous Articleओलमणी उच्च प्राथ.शाळेच्या दोन खोल्या बांधकामाचा शुभारंभ
Next Article मनपा कर्मचाऱयांनी वाचवला वासराचा जीव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.