वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मोमिनूल हक याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिली असून त्याला आयसोलेशनमध्ये त्याच्या स्वगृही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी बांगलादेशचा ज्येष्ठ क्रिकेटपटू मेहमुदुल्ला रियाद यालाही कोरोनाची बाधा झाल्याने तो पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेतील प्ले ऑफ सामन्यात खेळू शकला नाही. मोमिनूल हकची कोरोना चांचणी घेण्यात आली. त्यावेळी तो पॉझिटिव्ह असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रमुख फिजिसियन डॉक्टर देबाशीश चौधरी यांनी सांगितले. मोमिनूल हकच्या प्रकृतीबद्दल विशेष काळजी करण्याची जरूरी नसल्याचे चौधरी यांनी सांगितले. बांगलादेशचे मुर्तझा, अबू जायेद आणि सैफ हसन हे क्रिकेटपटू कोरोना व्याधीतून पूर्णपणे बरे झाले आहेत.