ऑकलंड : बांगलादेश क्रिकेट संघाचा नियोजित न्यूझीलंडचा दौरा कोरोना समस्येमुळे एका आठवडय़ाने लांबणीवर टाकल्याची माहिती क्रिकेट न्यूझीलंडने दिली आहे. या दौऱयात बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे न्यूझीलंड क्रिकेट मंडळासमोर पुन्हा नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोना संदर्भातील नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार असून आता सदर दौरा 20 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान निश्चित केला आहे. या निर्णयामुळे बांगलादेश संघाचे प्रयाण आता पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सात दिवसांच्या अंतराने पुढे ढकलण्यात आले आहे. 2019 च्या दौऱयानंतर बांगलादेशचा हा पहिला न्यूझीलंड दौरा आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना डय़ुनेडीन येथे 20 मार्चला होणार आहे. 23 मार्चला ख्राईस्टचर्च येथे दुसरा वनडे सामना तसेच 26 मार्चला वेलिंग्टनमध्ये तिसरा वनडे सामना होणार आहे. उभय संघातील टी-20 मालिकेला 28 मार्चपासून हॅमिल्टनमध्ये प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा सामना 30 मार्चला नेपियरमध्ये तर तिसरा सामना 1 एप्रिलला ऑकलंडमध्ये होणार आहे.
Next Article भारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.