वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या टी-20 संघाचा कर्णधार मेहमुदुल्ला याला कोरोनाची बाधा झाली असून तो पाक सुपर लीग टी-20 स्पर्धेच्या प्ले ऑफ सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
बांगलादेशचा 34 वर्षीय अष्टपैलू मेहमुदुल्ला रविवारी रात्री पाक सुपर लीग टी-20 स्पर्धेतील प्ले ऑफ सामन्यात खेळण्यासाठी ढाक्याहून दुबईमार्गे रवाना होणार होता. पण कोरोनाची बाधा झाल्याचे चांचणीत आढळून आल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध होवू शकणार नाही. पाक सुपर लीग टी-20 स्पर्धेत मेहमुदुल्ला मुल्तान सुल्तान्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. हा संघ या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर असून आता मेहमुदुल्लाच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. कोरोना बाधित झालेला मेहमूदुल्ला 21 किंवा 22 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱया बंगबंधू टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. मेहमुदुल्लाला काही दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.