चत्तोग्राम/ वृत्तसंस्था
विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशने तिसऱया दिवसअखेर 218 धावांची दमदार आघाडी घेतली. पहिल्या डावात 430 धावांचा डोंगर उभारल्यानंतर त्यांनी विंडीजला 259 धावांमध्ये गुंडाळले आणि शुक्रवारी 3 बाद 47 धावा जमवत एकत्रित आघाडी 218 धावांवर नेली. दिवसअखेर कर्णधार मोमिनूल हक 31 तर मुश्फिकूर रहीम 10 धावांवर नाबाद राहिले. विंडीजतर्फे रहकीम कॉर्नवलने 28 धावात 2 तर गॅब्रिएलने 13 धावात 1 बळी घेतला.