ऑनलाईन टीम / ढाका :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध करत ढाका येथील कट्टरपंथीयांनी शुक्रवारी आंदोलन छेडले. ढाक्यातील चटगाव येथील एका मशिदीतून सुरू झालेल्या या आंदोलनाला काही तासातच हिंसक वळण मिळाले. या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. तेथील स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
शुक्रवारी नमाज संपल्यानंतर ढाक्यातील चटगाव येथील बैतुल मुकर्रम परिसरात काही कट्टरपंथी एकत्र आले. त्यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. आंदोलनकर्त्यांनी हथाजरी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते. जखमींमधील 5 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासूनच बांग्लादेशच्या बॉर्डर्स गार्ड्सना तैनात करण्यात आले आहे. बॉर्डर गार्ड बांग्लादेशातकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एक आरक्षित निमलष्करी दल म्हणून कार्य करते.