बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन ; काम करण्यास मुभा देण्याची मागणीv
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या क्लोजडाऊन काळात बांधकाम क्षेत्राला काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगार, फरशी फिटींग, प्लंबिंग, पेंटर यासह इतर कामगार कामावर जाण्यासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांची पोलीस अडवणूक करत आहेत. त्यांना माघारी पाठवत आहेत. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा बांधकाम क्षेत्रातील विविध कामगारांना पोलिसांनी अडवू नये अशी सूचना करावी, अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका तसेच इतर जिह्यांतून आणि परराज्यांतून बांधकाम क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक कामगार आले आहेत. हे कामगार दररोज काम करून आपले कुटुंब सांभाळत आहेत. असे असताना त्यांची अडवणूक होत आहे. सरकारने कोरोनाची जी मार्गसूची जारी केली आहे त्यामध्ये बांधकाम कामगारांना काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्र खुले असल्यामुळे कामगार काम करण्यासाठी जात आहेत.
शहरासह इतर भागांमध्ये कामे सुरू आहेत. त्यामुळे हे कामगार जात असताना पोलीस अडवणूक करून त्यांच्यावर लाठी उगारत आहेत. पोटासाठी आम्ही आलो आहे. आम्ही बांधकाम कामगार आहे. बांधकाम कामगार कार्ड दाखविल्यानंतरही त्यांची अडवणूक होत आहे. त्यामुळे सरकारने दिलेले आदेश पोलीस पायदळी तुडवत आहेत. तेव्हा पोलीस प्रशासनाला बांधकाम कामगारांना अडवू नका, अशी सूचना करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
मतमोजणी पुढे ढकलावी
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीवेळी राजकीय पक्षांनी सभा आणि प्रचारफेऱया काढल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. बेळगावमध्ये रुग्ण वाढण्याचे मुख्य कारण म्हणून ही लोकसभा निवडणूकच आहे. आता 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, त्यावेळीही कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्याची शक्मयता आहे. तेव्हा मतमोजणीच पुढे ढकलावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बांधकाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. श्रीकांत पवार, ऍड. रोहित लातूर, यल्लाप्पा लक्ष्मण कोलकार, दत्ता परीट यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.