परदेशातील काही डॉक्टर रुग्णांच्या मदतीसाठी पुढे : ‘कोविड सपोर्ट ग्रुप’ची स्थापना
प्रतिनिधी / बेळगाव
परदेशात राहूनही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जन्मभूमीशी आपली नाळ जोडणारे परदेशातील काही डॉक्टर कोरोनाकाळात रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. स्थानिक सेवाभावी संघटनांच्या साहाय्याने त्यांनी हे काम सुरू केले आहे. यासाठी ‘कोविड सपोर्ट ग्रुप’ची स्थापना करण्यात आली असून हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे, जी चोवीस तास कार्यरत आहे.
गेल्यावषी कोरोनाकाळात याची सुरुवात झाली. डॉ. मकसुद पुणेकर हे इंग्लंडमध्ये राहतात. मात्र, मायभूमीचा विचार त्यांच्या मनात सदैव असतो. भारतातील लोकसंख्या आणि त्या तुलनेने तोकडी पडणारी आरोग्यसेवा याचा विचार करून त्यांनी काही लोकांना एकत्र करून एक ग्रुप तयार केला. बेळगावमध्ये अल् इकरा या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते फईम माडीवाले यांच्याशी त्यांनी संपर्क साधला व गतवषी काम सुरू केले.
यंदा कोरोनाची लाट तीव्र झाल्याने या डॉक्टरांनी पुन्हा आपले काम सुरू केले. मूळचे बेळगावचे व सध्या इंग्लंडमध्ये असणारे डॉ. मकसुद पुणेकर, डॉ. सईर ममन, डॉ. समिर नाईक, डॉ. नदीम अत्तार, डॉ. उमेद सय्यद, डॉ. नविल गांधी यांनी बेळगावमधील काही डॉक्टरांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून हा ग्रुप सुरू केला. याशिवाय टेलिकौन्सिलिंग व मार्गदर्शन सुरू केले आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱया व्यक्तीने फोन केल्यास डॉक्टरांतर्फे त्यांना सल्ला दिला जातो. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रीप्शन सादर केल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिला जातो. याशिवाय प्लाझ्मा देण्यासाठी किंवा घेण्यासाठीसुद्धा हेल्पलाईनवर संपर्क करता येईल. हा ग्रुप काही डायग्नोस्टिक सेंटरशी संलग्न असून औषध, स्कॅनिंग व रक्त तपासणी ही सेवा दिली जाते. घरीच क्वॉरंटाईनमध्ये असणाऱया रुग्णांनासुद्धा मदत केली जाते.
मृतदेहाला स्मशानापर्यंत घेऊन जाऊन अंत्यसंस्काराची सोयही हा ग्रुप करतो. विशेष म्हणजे एका समाजासाठी नव्हे तर सर्व समाजातील व्यक्तींसाठी हा ग्रुप कार्यरत आहे. स्थानिक पातळीवर फईम माडीवाले सक्रिय आहेत. त्यांना अन्य सदस्यांची मदत मिळते आहे. या ग्रुपमध्ये एकूण 20 संस्था संलग्न आहेत. आझमनगर, कॅम्प, अशोकनगर, गांधीनगर, अमननगर येथे संस्थेची केंदे कार्यान्वित आहेत.
हेल्पलाईनही सुरू
कोविड सपोर्ट ग्रुपने हेल्पलाईन सुरू केली असून तिचा क्रमांक 18001022716 असा आहे. संस्था काही ठराविक गोष्टींसाठी शुल्क आकारत असली तरी ज्यांना शक्मय नाही त्यांच्यासाठी विनामूल्य काम करते.