वार्ताहार / बांबवडे
बांबवडे तालुका शाहूवाडी येथे पोलीस चौकी समोर असलेल्या इमारतीवरून खुटाळवाडी तालुका शाहूवाडी येथील गणेश यशवंत चव्हाण वय २५ वर्षे या तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कोणीतरी युवक इमारतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्यावरून चाललेल्या लोकांनी पाहिले लगेच काही तरुणांनी छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. व त्याला जीवदान दिले. मात्र समोरच असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेत काढता पाय घेतला.