जमखंडी :
बागलकोट जिल्हय़ात कोरोनाचा कहर वाढला असून शुक्रवार दि. 24 रोजी 184 जणांना बाधा झाल्याचे आढळून आल्याने एकूण बाधित संख्या हजारावर पोचून 1168 झाली, तर एक बळी गेल्याने एकूण बळींची संख्या 39 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र यांनी दिली. जमखंडी 50, मुधोळ 42, बागलकोट 32, बदामी 32, हुनगुंद 30, बिळगी 4 असे एकूण 184 बाधित झाले आहेत. जमखंडी पोलीस ठाण्यातील 7 पोलीस, हुनगुंद व नवनगर येथील प्रत्येकी 1 पोलीस अशा एकूण 7 पोलिसांना बाधा झाली आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 22,142 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 20,623 निगेटिव्ह, 1168 पॉझिटिव्ह, 39 बळी, 507 बरे झाले. 625 रुग्णावर उपचार सुरू आहेत. 95 कंटेन्मेंट झोन आहेत. बागलकोट येथील खासगी दवाखान्यात एका 73 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कोविड मार्गसुचनेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आला.