प्रतिनिधी / मडगाव
बाणावली समुद्रकिनाऱयाजवळ ठेवण्यात आलेल्या 3 होडय़ांना मंगळवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. आगीत सुमारे 9 लाखांची हानी झाल्याचा प्राथमीक अंदाज आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर बाणावली येथील समुद्रकिनाऱयाजवळ आग लागल्याची माहिती मडगावच्या अग्नी शमन दलाच्या जवानाना मिळाली. लगेच दलाच्या जवानानी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रकिनाऱयावर वाहणाऱया वाऱयामुळे आगीची तीव्रता वाढत होती. अखेर या आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत बुधवारी पहाटेचे 4.45 वाजले होते अशी माहिती जवानानी दिली. या तिन्ही होडय़ा पाण्यातून वर काढून एका झोपडीत ठेवल्या होत्या.
आनारिता फर्नाडिस, कॉन्स्तासियो फर्नाडिस व विन्सेंत फर्नाडिस यांच्या या तीन होडय़ा होत आणि याच होडय़ातून ते मच्छीमारी करायचे अशी सुत्रानी माहिती दिली.