कुपवाड / प्रतिनिधी:
बामणोली (दत्तनगर) येथील खताचे गोडाऊन अज्ञात चोरटयांनी फोडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघड़कीस आला. यात चोरटयांनी गोडावुनमधील तब्बल सात लाख रुपये किंमतीची २८० खतांची पोती चोरून नेल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे.
समग्र ऑरगॅनिक ॲन्ड केमिकल प्रा.लि. असे चोरी झालेल्या खत कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या गोडाऊनच्या शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी ७ लाख ८ हजार ७२९ रुपयांची २८० खतांची पोती चोरली आहेत. कंपनी मालक विनोद सुभाष पवार (रा.मणेराजूरी ता.तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.