प्रतिनिधी / रत्नागिरी :
महामार्गवर अपघात झाल्यानंतर जखमींवर त्वरीत प्राथमिक उपचार व्हावेत यासाठी महामार्ग लगत असलेल्या गावातील निवडक व्यक्तींना प्रशिक्षण देवून त्यांची ‘हायवे मृत्यूंजय देवदूत’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, अशा 100 देवदूतांना प्रशिक्षण महामार्ग पोलीसांकडून देण्यात आले असून मंगळवारी यांना मेडिकल साहित्याचेही वाटप करण्यात आले.
यावेळी महामार्ग डिव्हिजन प्रभारी रेश्मा पुंभार, हातखंबा महामार्ग सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील, डेरवण वालावलकर हॉस्पीटलचे प्रशासकीय अधिकारी प्रफुल्ल गोडबोले, तरूण भारत प्रतिनिधी जान्हवी पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष सावंत, सचिन साळवी यांच्यासह सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी, प्रातिनिधीक स्वरूपात मृत्यूंजय देवदूत उपस्थित होते.
यासाठी मार्चमध्ये 100 व्यक्तींना परिपूर्ण ट्रेनिंग डेरवण हॉस्पीटल येथे देण्यात आले आहे. अशा प्रकारे महामार्गावर पहिल्यांदाच उपकम सुरू करण्यात आला असून याची निश्चित मदत होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी सांगितले.