ऍक्टिव्ह ग्राहकांच्या संख्येत 43 टक्क्मयांची वाढ : ई शिक्षणाचा विस्तार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करुन देणारी स्टार्टअप कंपनी बायजूस येत्या काळात जवळपास हजारो लोकांना रोजगार देणार आहे. आगामी सहा महिन्यात व्यवसाय, कंटेट आणि कोर्सेस वाढविण्यासाठी विचार करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या कामांसाठीच कंपनी जवळपास चार हजार लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणार असल्याचे समजते.
कोविड 19 आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्याची व देण्याची सोय नव्याने उदयास येत असल्याचे समोर येत आहे. हीच संधी विचारात घेत बायजूस आपल्या सेवांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यावर भर देत असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण बंदच्या कालावधीत बायजूस या भारतीय
ऍपच्या आधारे शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करुन देत आहे.
बायजूस एकमेव लर्निंग ऍप
याच दरम्यान गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक वेळा हे ऍप डाऊनलोड करण्यात आल्याची माहिती आहे. सेंसर टॉवरच्या एप्रिल 2020 च्या जागतिक अहवालामधून शाळांचे शिक्षण ऑनलाईन देणारे बायजू एकमेव लर्निंग ऍप असल्याचे सांगितले आहे तर वापरकर्त्यांची संख्या 43 टक्क्मयांनी वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मार्चमधील नवीन विद्यार्थी जोडणी
मार्च महिन्यातच फक्त या ई एज्युकेशन प्लॅटफार्मवरुन जवळपास 60 हजार नवीन विद्यार्थी जोडले गेले आहेत. एप्रिलमध्ये ही संख्या 75 लाखावर पोहोचली आहे तर एप्रिलऐवजी मे महिन्यात विक्रीत तेजी राहिल्याचे बायजूचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर मृणाल मोहिते यांनी म्हटले आहे. मे महिन्यात विक्री 370 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.