प्रतिनिधी / वास्को
मुरगांव पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 12 मधिल युवा कार्यकर्त्यांतर्फे स्थानिक नगरसेवक दीपक नाईक यांच्या सहकार्याने 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोविड 19 विरोधात सेवा बजावलेल्या प्रंटलाईन कोरोना वॉरियर्स व शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. कोरोनासंबंधीत सरकारच्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मुरगावच्या उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर, नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स, नगरसेवक राजन फळदेसाई, नगरसेवक निलेश नावेलकर, वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक दीपक नाईक, मंडळाचे सचिव रूपेश पालयेकर, मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरीश नाईक, सरचिटणीस अमेय चोपडेकर, संदीप नार्वेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी कोरोना आजाराविरूद्ध लढा देण्यासाठी नागरिकांनी एकसंघ राहण्याचे आवाहन केले. यावेळी गोवा पोलीस, वीज खाते, अग्नीशामक दल, कदंब महामंडळ, मुरगांव पालिका, बीएलओ आदींचा कोविड 19 विरोधात सेवा बजावलेल्या प्रंटलाईन कोरोना वॉरियर्स व शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.