प्रतिनिधी / काणकोण
गोव्याचे मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपल्या कुटुंबियांसहित 18 रोजी काणकोण मतदारसंघाला धावती भेट दिली. ही त्यांची या मतदारसंघाला पहिलीच भेट होती. दुपारी त्यांनी राजबाग-तारीर येथील दि ललित रिसॉर्टमध्ये भोजन करून विश्रांती घेतली आणि संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान त्यांनी राजभवनकडे प्रयाण केले. त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही त्यांची खासगी भेट होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.