विकार कितीही दुर्धर असो, इंजेक्शन किती किमीतचे असू शकेल, हा प्रश्न एका घटनेमुळे निर्माण झाला आहे. मुंबईत एका रूग्णालयात एका 5 महिन्याच्या बालिकेवर दुर्मिळ रोगासाठी उपचार सुरू आहेत. त्याला जगातील सर्वात महागडे इंजेक्शन दिल्याखेरीज त्याचा रोग बरा होणार नाही, असे डॉक्टरांचे निदान आहे.
पण या इंजेक्शनची किंमत समजल्यानंतर आपलेही डोके भिरभिरल्यासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. याची किंमत आहे तब्बल 16 कोटी रूपये. ज्या बालिकेला ते दिले जाणार आहे, तिचे नाव आहे तीरा. तिचे एक फुप्फुस निकामी झाले असून तिला दूध पिण्यासही असहय़ त्रास होतो. तिचे हे त्रास तिच्या जन्मानंतर काही तासातच लक्षात आले होते. तिला झालेला विकार हा कर्करोगापेक्षाही भयंकर आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा विकास लाखो लोकांमध्ये एखाद्याला असतो. त्यामुळे उपचारही अत्यंत महाग आहेत. इतके महाग इंजेक्शन देण्याचे हे भारतातील प्रथमच प्रकरण आहे, असेही बोलले जाते. एवढय़ा महाग उपचारानंतर तरी बालिकेचा जीव वाचावा अशीच सर्वांची प्रार्थना आहे.