प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या बाळूमामा ट्रस्ट रूग्णालयात कोवीड-19 हेल्थ सेंटर लवकरच कार्यान्वीत करून तालुक्यातील गारगोटी येथील ग्रामीण रूग्णालय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी दिली. तर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील जागेची पाहणी करताना आली. यावेळी गारगोटी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भगवान डवरी प्रमुख उपस्थित होते.
आमदार आबिटकर म्हणाले, मुंबई, पुणे यासारख्या शहरातून येणार्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं जरूरीचे आहे. या पुढील काळात कोरोनाचा कम्युनीटी संक्रमणाचा काळ असल्याने रूग्णांची संख्या वाढू शकते. यासाठी संशयीत रूग्णावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. याकरीता गारगोटी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात रुग्णांची तपासणी होईल. तर बाळूमामा ट्रस्टच्या रूग्णालयात डेडीकेटेड कोवीड-19 रूग्णावर उपचार केले जातील असे सांगितले. तसेच सर्दी, ताप व संशयित रूग्णावर ग्रामसेवक प्रशिक्षण रूग्णावर उपचार केल जाणार असुन या ठिकाणी सुमारे 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयीत रूग्णांचे स्वॅबही या ठिकाणीच घेतल जातील असे सांगीतले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. भगवान डवरी म्हणाले, कोवीड-19 रूग्णावर उपचार करणार्याआ डॉक्टरांचे प्रशिक्षण झाले असुन साहित्यही आले असून लवकरच हेल्थ केअर सेंटर सुरु केले जाईल असे त्यांनी सांगीतले. यावेळी आमदार आबिटकर यांनी सर्व डॉक्टर, आरोग्य यंत्रणेलाही महत्वपुर्ण सुचना दिल्या. यावेळी डॉ. श्रीकांत बिराजदार, डॉ. संगमेश्वर महाजन, रविराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे यासह आरोग्य विभागाच कर्मचारी उपस्थित होते.