वार्ताहर / सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथील मठ गल्लीतील शेतकरी जोतिबा कृष्णा चंदगडकर यांच्या परसातील गवतगंजीला अज्ञातांनी आग लावल्याने सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
आगीच्या घटनेनंतर लगेच वायूदल केंद्रातील व बेळगाव येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तीन बंबांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आग आटोक्यात आणली. ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. याठिकाणी आजुबाजूला इतर शेतकऱयांच्याही गवतगंजी होत्या. अग्निशमन दल व ग्रामस्थांनी आग वेळीच आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत 4 ट्रक्टर कडबा व कुटुंबीयांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.