आमदार रमेश तवडकर यांचे आश्वासन
प्रतिनिधी /काणकोण
बाळ्ळी ते गुळेपर्यंतच्या रस्त्याच्या त्याचप्रमाणे गुळेहून पैंगीणमार्गे माशेपर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम 1 एप्रिलपूर्वी सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी दिले आहे. सदर रस्त्याच्या रेंगाळलेल्या डांबरीकरणासंबंधी काणकोणच्या काँग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार तवडकर यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांना या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यासंबंधी निवेदन सादर केले. प्रदेश काँग्रेस सरचिटणीस जनार्दन भंडारी, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, काणकोण गट काँग्रेस अध्यक्ष प्रलय भगत, विकास भगत, आबेल बोर्जिस, गास्पार कुतिन्हो आणि अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.