अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर
वॉशिंग्टन
अमेरिकेच्या एका खासदाराने पाकिस्तानचा प्रमुख बिगर-नाटो सहकारी देशाचा दर्जा संपुष्टात आणण्यासाठी प्रतिनिधिगृहात एक विधेयक सादर केले आहे. रिपब्लिकन पार्टीचे खासदार एंडी बिग्स यांनी हे विधेयक मांडले आहे.
प्रमुख बिगर-नाटो सहकारी म्हणून पाकिस्तानला अमेरिकेकडून संरक्षण पुरवठा तसेच सहकार्यात्मक संरक्षण संशोधन तसेच विकास प्रकल्पांमध्ये भागीदारी यासारखे विविध लाभ मिळतात. हक्कानी नेटवर्क विरोधात पाकिस्तान सैन्यमोहीम राबवत नाही तोवर अमेरिकेचा अध्यक्ष या देशाला प्रमुख बिगर-नाटो सहकाऱयाचा दर्जा देऊ शकत नसल्याचे विधेयकात म्हटले गेले आहे.