ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस अक्षरशः थैमान घालत आहे. या विषाणूने सामान्य जनतेसह राजकिय नेते, बॉलीवूडमधील कलाकार, खेळाडू अनेक जणांना आपले शिकार बनवले आहे. त्यातच आता बिग बॉस 14 फेम सारा गुरपाल हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
सारा गुरपाल हिने स्वतः इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. तिने सांगितले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर मी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. तसेच आपण सर्वांनी देखील आपल्या तब्येतीची काळजी घ्या असे म्हटले आहे. तसेच मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही केले आहे.
दरम्यान, यापूर्वी बिग बॉसमधील स्पर्धक निशांत सिंह मलकानी याला देखील कोरोनाची बाधा झाली होती.