वृत्तसंस्था/ मुंबई
आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड बिझनेस सायकल फंड 15 नोव्हेंबर रोजी खुला करणार आहे. सदरचा हा नवीन फंड 29 नोव्हेंबर रोजी बंद होणार असल्याची माहिती आहे. हा ओपन एंडेड इक्विटी स्कीमवर आधारीत असून बिझनेस सायकलवर आधारीत गुंतवणूक निश्चित होणार असल्याची माहिती आहे.
शेअर बाजारात रिटर्न मिळण्यासह विविध टप्प्यावर बिझनेस चक्र प्रभावीत होत आहे. यामध्ये कोणत्याही व्यवसायातील चक्रामध्ये विविध टप्पे राहतात. सूक्ष्म पातळीवर गुंतवणूक होत गेल्यास त्यामधून मिळणारा परतावाही आकर्षक मिळत गेल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
दबावासोबत अर्थव्यवस्थेचा प्रवास
अर्थव्यवस्था ही टप्प्या टप्यावर विस्तार व घसरणीचा प्रवास करत आहे. परंतु या सर्वामधून सावरत पुन्हा अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. यामध्ये सुरक्षित अशा एफएमसीजी, हेल्थकेअर व आयटी या क्षेत्रात घसरण राहिली असल्याचेही आदित्य बिर्ला सनलाईफचे व्यवस्थापकीय संचालक ए. बालासुब्रम्हण्यम यांनी सांगितले आहे.