ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये मागील 24 तासात 596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 42 हजार 748 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 575 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,42,748 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 36 हजार 189 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.30 % आहे. तर आतापर्यंत 1, 317 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 5,241 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 61 लाख 54 हजार 121 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 241 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.