ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पार्टीचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज माझ्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मागील एक आठवड्यात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी देखील स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
दरम्यान, देशातील अन्य राज्यांप्रमाणे बिहारमध्ये देखील कोरोनाचे नवे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी 500 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत 2,43,248 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सद्य स्थितीत 5,189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे.