के. आर. शेट्टी किंग्स टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के.आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के.आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बीसीसी मच्छे संघाने झेवर गॅलरी डायमंड संघाचा 38 धावानी तर साईराज वॉरियर्सने अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाचा 9 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. वेंकटेश शिराळकर बीसीसी मच्छे, ओंकार वेर्णेकर साईराज वॉरियर्स यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेलया पहिल्या सामन्यात बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 7 बाद 182 धावा केल्या. वेंकटेश शिराळकरने 1 षटकार 9 चौकारासह नाबाद 85, राहुल शिंदेने 3 षटकार 3 चौकारासह 13 चेंडूत 34, शिवप्रकाश हिरेमठने 24 धावा केल्या. झेवर गॅलरी डायमंडतर्फे रोहित पाटीलने 26 धावात 3 तर आनंद कुंभार व माजिद मकानदार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवर गॅलरी डायमंड संघाने 20 षटकात 8 बाद 144 धावाच केल्या.
अमेय भातकांडेने 1 षटकार 2 चौकाराह 46, चेतन पांगिरेने 2 षटकार 2 चौकारासह 24, माजिद मकानदारने 1 षटकार 1 चौकारासह 20, आनंद कुंभारने 16 तर साकिब सराफने 15 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे भरत गाडेकरने 23 धावात 4, दीपक नार्वेकरने 30 धावात 3, आकाश असलकरने 32 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर संघाने 16.4 षटकात सर्व बाद 79 धावा केल्या. वसंत शहापूरकरने 1 षटकार 5 चौकारासह 34 तर वैष्णव संघमित्रने 11 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे नरेंद्र मांगुरेने 13 धावात 3, ओंकार वेर्णेकरने 8 धावात 2, मणिकांत बुकीटगारने 4 धावात 2, दीपक राक्षेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज वॉरियर्सने 6.5 षटकात 1 बाद 80 धावा करून सामना 9 गडय़ानी जिंकला. सुधन्वा कुलकर्णीने 3 षटकार 4 चौकारासह 23 चेंडूत 44, सुजय सातेरीने 2 षटकार 3 चौकारासह 12 चेंडूत 27 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे स्वप्निल हेळवेने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उमा कुंदरनाड, दीपा देसूरकर, मयूरी नाईक, आशिष चव्हाण, मलगौडा नाईक यांच्या हस्ते सामनावीर ओंकार वेर्णेकर, इम्पॅक्ट खेळाडू नरेंद्र मांगुरे, उत्कृष्ट झेल सरफराज मुल्ला. सर्वाधिक षटकार सुधन्वा कुलकर्णी तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे विजय शेट्टी, शरद शेट्टी, रक्षित शेट्टी, सुनील नायर आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर वेंकटेश शिराळकर, इम्पॅक्ट खेळाडू भरत गाडेकर, सर्वाधिक षटकार राहुल शिंदे, उत्कृष्ट झेल आकाश पत्तार यांना चषक देवून गौरविण्यात आले.
शनिवारचे सामने : झेवर गॅलरी डायमंड वि. साई स्पोर्ट्स सकाळी 9.30 वा., मार्ग रायजिंग स्टार वि. साईराज वॉरियर्स दु. 1.30 वा.