थलपति विजयसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार
सुपरस्टार थलपित विजय आणि पूजा हेगडे यांच्या ‘बीस्ट’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरू आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसून येणार आहे. मल्याळम अभिनेत्री अपर्णा दास देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा हेगडे मुख्य नायिका म्हणून या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अपर्णा या चित्रपटात निगेटिव्ह शेडच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या चेन्नईच्या गोकुलम स्टुडियोमध्ये सुरू आहे. रॉकस्टार अनिरुद्ध रविचंद्र यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘बीस्ट’ हा चित्रपट पुढील वर्षी जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटात मास्टर फेम थलापति विजय असल्याने याला मोठा प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.
बीस्ट हा ब्लॅक कॉमेडी ऍक्शन थ्रिलर तमिळ चित्रपट असून त्याचे बजेट खूपच मोठे आहे. शॉपिंग मॉलमध्ये दहशतवाद्यांकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या दुकानदारांच्या एका समुहाला वाचविण्यासाठी एका व्यक्तीच्या शोधाभोवती घुटमळणारी याची पटकथा आहे.