प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची बाधा होवून मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी बेळगाव जिह्यातील 8 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिह्यात दिवसभरात 309 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय बुलेटीनमधून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्मयातील 85 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 24 तर शहरी भागातील 61 जणांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार 268 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. संबंधितांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.
कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मृत्यूचा वाढता दर चिंतेचे कारण बनत चालला आहे. बेळगाव जिह्यातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 231 वर जावून पोहोचली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 849 इतकी झाली होती. त्यापैकी 6 हजार 450 जणांना उपचारांती घरी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2 हजार 651 अहवालांची प्रतिक्षा आहे.
गणेशोत्सव महामंडळे व सामाजिक सेवा संस्थांच्या माध्यमातून ठिकठिकाणी फ्ल्यु क्लिनीक उभारुन आजारी पडणाऱयांना वेळेत उपचार उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था सुरु आहे. दरम्यान कोरोनाचे संकट टळण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी उपचार केंदे सुरु करण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.