निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅरिकेडस् लावल्याने समस्या
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच बी. के. मॉडेल शाळेकडे जाणाऱया सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. कॅम्प फिशमार्केटजवळ लावलेल्या बॅरिकेड्समुळे रुग्णवाहिकेला देखील जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे माघारी परतावे लागले.
महापालिका निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यावेळी नागरिकांची आणि समर्थकांची गर्दी होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. फिश मार्केट परिसरात दोन्ही बाजूच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आल्याने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. ये-जा करण्यासाठी नागरिकांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागला. टिळकवाडीकडून शहरात येणाऱया खानापूर रोडमार्गे रुग्णवाहिका येत होती. मात्र फिशमार्केट जवळ बॅरिकेड्स लावल्याने रुग्णवाहिकेला जाता आले नाही. सदर बॅरिकेड्स हटविता येणे शक्मय नव्हते. त्यामुळे सदर रुग्णवाहिका माघारी घेण्याची सूचना करण्यात आली. रुग्णवाहिका चालकाने माघारी घेऊन अन्य मार्गाने निघून गेला. वास्तविक पाहता रुग्णवाहिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा ठेवणे गरजेचे होते. पण रस्ता देण्यात आला नसल्याने नेहमीच्या रस्त्यावरून ये-जा करता आली नाही..