प्रतिनिधी /बेंगळूर
ड्रग्ज पुरवठेदारांविरोधात बेंगळूर शहर पोलिसांनी कारवाई गतीमान केली आहे.सोमवारी पश्चिम विभागाच्या पोलिसांनी दोघा ड्रग्ज पेडलरना अटक केली आहे. त्यांच्याजवळील 110 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. देवनहळ्ळी येथून महिंदा बोलेरो कारमधून गांजाचे गाठोडे नागरभावी येथे नेण्यात येत असल्याचा सुगावा लागल्यानंतर अन्नपुर्णेश्वरीनगर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती डीसीपी संजीव पाटील यांनी दिली.
1.85 कोटींचे हॅश ऑईल जप्त लॉकडाऊन शिथिल होताच बेंगळुरात अमली पदार्थ विक्री करणाऱया टोळय़ा सक्रिय झाल्या आहेत. एका जुन्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मडिवाळ पोलीस जोगी कॉलनी येथे गेले होते. त्यावेळी तेथे चार युवक संशयास्पदरित्या वावरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याजवळ ड्रग्ज आढळून आल्याने चौघांना अटक करण्यात आली असून 1.85 कोटी रुपये किमतीचे हॅश ऑईल आणि 4 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी सदर ड्रग्ज आंध्रप्रदेशमधून आणल्याचे समजते.