बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) याविषयी मंगळवारी आपला अंदाज वर्तविला दरम्यान पुढील दोन दिवसात बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हंटले आहे.
दरम्यान, आयएमडीचे संचालक सी. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे वातावरण शहरातील कमाल व किमान तापमान अनुक्रमे २७ व २० अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.
बेंगळूरमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच घराबाहेर पडताना यावेळी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे म्हंटले आहे.