बेंगळूर/प्रतिनिधी
शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजाराहून अधिक वाढ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या ४३,३७८ वर गेली. शनिवारी जिल्ह्यात ४,०८३ नवी कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. तर त्याच शनिवारी २,४९४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शनिवारी कोरोनाचे ८ हजाराहून अधिक रुग्ण सापडले. दरम्यान राज्यात शनिवारी ८,८११ नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर दिलासा देणारी बाब म्हणजे त्याच वेळी ५,४१७ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०१७८२ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाने ८६ जणांचा बळी गेला आहे.