बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बेंगळूरसह राज्याच्या बहुतांश भागात व्यापक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आयएमडी बेंगळूरचे प्रभारी संचालक सी. एस. पाटील म्हणाले की, राज्याच्या काही भागात आणि शहरात पाऊस पडणार आहे कारण पश्चिमेकडील जोरदार वारा तसेच उष्णता आणि आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
आयएमडीच्या मते, पुढील पाच दिवसांसाठी किनारपट्टी आणि दक्षिण-आतील कर्नाटकच्या बहुतेक भागात व्यापक पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. उत्तर-आतील कर्नाटकात या दिवसांमध्ये मध्यम पाऊस पडेल. आयएमडीने शुक्रवारी किनारी कर्नाटकातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.