बेंगळूर/प्रतिनिधी
प्राध्यापक गोविंद रंगराजन यांची भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) च्या पुढील संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १ ऑगस्टला ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे संचालक प्राध्यापक अनुराग कुमार यांची १ जुलै रोजी मुदत पूर्ण होणार आहे. यांनतर प्राध्यापक गोविंद रंगराजन पदभार स्वीकारणार आहेत.
आयआयएससीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर आयआयएससीच्या गव्हर्निंग कौन्सिलने प्राध्यापक रंगराजन यांना पुढील संचालक म्हणून नियुक्त करण्यास मान्यता दिली. प्राध्यापक रंगराजन यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पिलानी व एम.एस्.सी. पदवी आणि मैरीलैंड विश्वविद्यालय कॉलेज पार्क, येथून पीएचडीची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळेत काम केले आहे. 1992 मध्ये ते भारतात परतले. ते सध्या आयआयएससीमध्ये आंतरविभागीय संशोधन विभागाचे अध्यक्ष आहेत ज्यात 10 विभाग आणि केंद्रे आहेत.